राष्ट्र आणि हिंदु द्रोही षड्यंत्राच्या विरोधात राष्ट्रनिष्ठ पत्रकारांनी संघटित व्हायला हवे ! – चेतन राजहंस, सहसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह

श्री. चेतन राजहंस

यंदा हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यात ११ मार्च या दिवशी ३२ लाख भाविक पवित्र स्नान करण्यास आले. त्यानंतर ३१ मार्चपर्यंत उत्तराखंड राज्यात केवळ २९२ जणांनाच कोरोनाचा संसर्ग झाला. वस्तूतः शासकीय आकडेवारीनुसार,  कुंभक्षेत्री कोरोना संसर्ग अतिशय न्यून प्रमाणात होता. तरीही कुंभमेळ्याला ‘कोरोनाचे केंद्रस्थान’ असा अपप्रचार हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांनी केला. दुसरीकडे रमझान ईदच्या वेळी देशभरात अनेक ठिकाणी मुसलमानांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. त्याविषयी माध्यमांनी बातम्या का दाखवल्या नाहीत ? यातून कुंभमेळ्याची व्यवस्था करणार्‍या शासनाला अपकीर्त करण्याचे माध्यमांचे षड्यंत्र स्पष्टपणे दिसून आले. या आणि अशा प्रत्येक राष्ट्र आणि हिंदु द्रोही षड्यंत्राच्या विरोधात सर्वच देशभक्त पत्रकारांनी संघटित व्हायला हवे.