लोकहिताचे ‘हिंदु राष्ट्र’ येवो जगती ।
आता हीच प्रार्थना ईश्वरचरणी ।।
संप नि बंदी यांनी (टीप १) घेरले असता ।
देवा, मी स्वतंत्र कसा ? ।। १ ।।
घराणेशाहीची सत्ता असता ।
लोकशाहीचा मी नागरिक कसा ? ।। २ ।।
साम्यवाद्यांनी धर्म नष्ट केला असता ।
धर्माभिमानी मी होऊ कसा ? ।। ३ ।।
बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी अंध केले असता ।
श्रद्धावान मी होऊ कसा ? ।। ४ ।।
दुराचार्यांची बजबजपुरी असता ।
प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष मी होऊ कसा ? ।। ५ ।।
फुटीरतावादी राष्ट्रद्रोही माजले असता ।
ज्वलंत राष्ट्राभिमानी मी होऊ कसा ? ।। ६ ।।
अल्पसंख्यांकांचा अतिरेक असता ।
हिंदु धर्माभिमानी मी होऊ कसा ? ।। ७ ।।
जनता आपत्काळाने पिडली असता ।
सुखा-समाधानाने मी राहू कसा ? ।। ८ ।।
लोकहिताचे ‘हिंदु राष्ट्र’ येवो जगती ।
हीच प्रार्थना ईश्वरचरणी आता ।। ९ ।।
टीप १ – लोकशाहीच्या नावाखाली फुटीरतावादी, धर्मविरोधी आणि राष्ट्रविरोधी यांनी सर्वत्र संप, बंदी अन् देशाच्या संपत्तीची हानी करून जनतेस वेठीस धरले आहे, उदा. आज शेतकरी हिताच्या नावाखाली ‘भारत-बंद’ पुकारला आहे.’
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.१२.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |