गुरुपौर्णिमेच्या दिवशी कु. शताक्षी पोहनकर (वय १० वर्षे) हिने घेतलेला भावप्रयोग !

‘शताक्षी’ हे नाव रेणूकामातेचे आहे. – संकलक

१. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व दिंड्या वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात पोचल्यावर ध्यानमंदिरात फुलांनी सजवलेल्या गालिच्यावर ठेवणे आणि सर्व साधक परात्पर गुरुमाऊलीची आतुरतेने वाट पहाणे

श्री गुरुपादुका

‘सर्व दिंड्या वैकुंठरूपी रामनाथी आश्रमात पोचल्या आहेत. तेथे दीपोत्सव चालू असल्याने वातावरण प्रकाशमय झाले आहे. गुरुतत्त्व आणि कृष्णतत्त्व असलेल्या रांगोळ्या काढल्या आहेत. संपूर्ण आश्रम फुलांच्या माळांनी सजवला आहे. आंब्यांच्या पानांची तोरणे लावली आहेत. वातावरणात उत्साह, आनंद आणि चैतन्य पसरले आहे. दिंडीतील साधकांनी त्यांच्या मस्तकावरून आणलेल्या गुरुपादुका आश्रमातील ध्यानमंदिरात फुलांनी सजवलेल्या गालिच्यावर ठेवल्या आहेत. गुरुमाऊलींच्या कक्षापासून ध्यानमंदिरापर्यंत मखमली पायघड्या घातल्या आहेत आणि त्यावर मोगर्‍याच्या फुलांची सजावट केली आहे. सर्व साधक ‘जय गुरुदेव’, असा जयघोष करत परात्पर गुरुमाऊलीची आतुरतेने वाट पहात आहेत.

२. लवकरी भेट द्या हो या भक्ता, प.पू. गुरुदेवा भगवंता ।।

कु. शताक्षी पोहनकर

‘प.पू. गुरुदेवा, भगवंता ।
द्या भेट या वारकर्‍यांना लवकरी आता ।। १ ।।

सोबतीला तुमच्या न्या हो आम्हाला नाथा ।
अमुच्या हृदयाशी जुळले तुमचे नाते आता ।। २ ।।

लवकरी भेट द्या हो या भक्ता ।
प.पू. गुरुदेवा, भगवंता ।। ३ ।।

३. भावपूर्ण भजनाने परात्पर गुरु डॉक्टरांना आळवणे

असे भावपूर्ण भजन म्हणत तिने गुरूंना पाद्यपूजेसाठी पुढील ओळी म्हणत आळवले.

पधारो नाथ पूजा को । हृदयमंदिर सजाया है ।।
तुम्हारे वास्ते आसन । विमल मन का बिछाया है ।।

४. साधकांनी परात्पर गुरुमाऊलीचा दर्शन सोहळा अनुभवणे आणि सर्व साधकांनी स्वतःतील स्वभावदोष अन् अहं सूक्ष्मातून अर्पण करणे

काही क्षणांनंतर परात्पर गुरुमाऊली पायघड्यांवरून येत आहे. गुरुमाऊलीवर देवता आणि ऋषिमुनी पुष्पवृष्टी करत आहेत. हा सोहळा पहाण्यासाठी सद्गुरु, संत, साधक आणि बालसाधक उपस्थित आहेत. सर्व साधक अत्यानंदाने आणि भावविभोर होऊन हात जोडून गुरुमाऊलीकडे पहात आहेत. परात्पर गुरुमाऊली रत्नजडित सिंहासनावर बसली आहे. त्यांच्या बाजूच्या सिंहासनावर प.पू. भक्तराज महाराज यांची प्रतिमा ठेवली आहे. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ परात्पर गुरुमाऊलीचे पाद्यपूजन करत आहेत. सर्व साधकांनी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं सूक्ष्मातून अर्पण केले.

जीवन में मेरे आप ही बसे गुरुदेव ।
मन में मेरे और कुछ ना रहे गुुरुदेव ।।

आपने ही हमें साधना सिखाई गुरुदेव ।
बस रहे मन में कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता ।।

हा भावप्रयोग अनुभवून सर्वांना रामनाथीला प्रत्यक्ष गेल्याचे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन घेतल्याची अनुभूती आली.

५. वारीतील सर्व साधकांनी गुरुचरणी विसावा घेऊन गुरुमाऊलीकडून गुणांची शिदोरी घेऊन आपापल्या गावी जाऊन वारीची सांगता करणे

रामनाथीचा चैतन्यमय आश्रम पाहून आणि परात्पर गुरुमाऊलीच्या चरणांवर डोके टेकवल्याने वारीला आलेल्या सर्व साधकांचा भाव जागृत झाला. ‘अहंकार तो अमुचा समूळ गळो’, या भजनाने वारीची सांगता झाली. गुरुचरणी विसावा घेऊन साधकांनी त्यांच्या चरणांवर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं त्यागले अन् गुरुमाऊलीकडून गुणांची शिदोरी घेऊन वारीतील सर्व साधक आपापल्या गावी जायला निघाले.

– सौ. मनीषा गजानन पोहनकर, अमरावती (२७.७.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक