आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

‘परभणी जिल्ह्यातील सेलू येथील पोलीस उपअधीक्षक (उपविभागीय पोलीस अधिकारी) राजेंद्र पाल आणि पोलीस नाईक गणेश चव्हाण यांनी तक्रारदाराकडून १० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना २४.७.२०२१ या दिवशी अटक केली. (परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ? – संपादक)’