(म्हणे) ‘लोकांना गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल !’

मेघालयातील भाजप शासनातील पशूसंवर्धन मंत्री सानबोर शुलाई यांचे गोविरोधी विधान !

सानबोर शुलाई

शिलाँग (मेघालय) – मी लोकांना चिकन, मटण किंवा मासे यांपेक्षा अधिक  गोमांस खाण्यास प्रोत्साहित करतो. लोकांना अधिक गोमांस खाण्यास प्रोत्साहन दिल्यास ‘भाजप गोहत्येवर बंदी घालत आहे’ हा अपसमज दूर होईल. लोकशाही असणार्‍या देशात प्रत्येकाला जे हवे ते खाण्यास मोकळीक आहे. ज्याला जे मनात येईल ते तो खाऊ शकतो, असे विधान मेघालयात सत्तेत असलेल्या भाजप सरकारचे पशूसंवर्धन आणि पशूवैद्यकीय मंत्री सानबोर शुलाई यांनी केले. शुलाई यांनी गेल्याच आठवड्यात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शुलाई यांनी आश्‍वासन दिले, ‘मी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याशी आसाममध्ये लागू करण्यात आलेल्या गोहत्या कायद्याविषयी बोलीन. त्यामुळे मेघालयातील गुरांच्या वाहतुकीवर या नवीन कायद्याचा परिणाम होणार नाही.’

आसाममध्ये ठराविक ठिकाणांव्यतिरिक्त अन्य कुठेही गोमांस खरेदी आणि विक्री करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपचे पशूसंवर्धन मंत्री सानबोर शुलाई यांचे गोविरोधी विधान

‘ज्या ठिकाणी हिंदु, जैन, शीख समाजाचे लोक रहातात, त्या ठिकाणी गोमांस विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची विक्री करता येणार नाही. काही धार्मिक सणांच्या वेळी सूट दिली जाऊ शकते’, असे या निर्णयात म्हटले आहे.