आसाममध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

  • भारतात ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी आता हिंदूंनी केली पाहिजे !
  • भाजप सरकारनेही यासाठी प्रयत्न करावेत, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
साहाय्य करण्याच्या नावाखाली रंजन सुतिया याने शेकडो हिंदूंचे धर्मांतर केल.

दिब्रूगड (आसाम) – आसाम पोलिसांनी येथील ख्रिस्ती मिशनरी (धर्मप्रचारक) रंजन सुतिया याला लोकांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. हिंदु युवा विद्यार्थी परिषदेकडून रंजन सुतिया याच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (अशी तक्रार का करावी लागते ? पोलिसांच्या हे लक्षात का येत नाही ? आसाममध्ये भाजपचे राज्य असतांना सरकारने पोलिसांना या संदर्भात अधिक सतर्क रहाण्याचा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

धर्मांतरासाठी रंजन सुतिया याने येथील १५ व्या शतकातील संत श्रीमंत शंकरदेव यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक गीतांचा वापर केला. या गीतांमध्ये त्याने पालट करत त्यात येशूचे नाव घुसडले होते. (कावेबाज ख्रिस्ती धर्मप्रचारक ! – संपादक) रंजन सुतिया येथे ‘वर्ल्ड हिलींग प्रेयर सेंटर’ही चालवत होता. येथे येशू ख्रिस्ताच्या शक्तीद्वारे रुग्णांना बरे करण्याच्या नावाखाली त्यांचा बुद्धीभेद करण्यात येत होता. (अंनिसवाल्याने असे हिलींग सेंटर्स दिसत नाहीत का ? – संपादक) त्यानंतर त्यांचे धर्मांतर केले जात होते. आरोग्य सुविधा आणि आर्थिक साहाय्य करण्याच्या नावाखाली रंजन सुतिया याने शेकडो हिंदूंचे धर्मांतर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. (या हिंदूंना परत हिंदु धर्मात आणण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने आणि तेथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)