१ किलोमीटरच्या परिसरात वाहनांना बंदी !
लोणावळा – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून लोणावळा आणि मावळ येथील सर्वच पर्यटनस्थळी १४४ कलम लागू करत जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास अटकाव करण्यात आला असून पर्यटनस्थळ आणि धबधब्यापासून एक किलोमीटरच्या परिसरात वाहनांना बंदी घातली आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावनी लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील भुशी धरण, घुबड तलाव, पवना, लोणावळा, तुंगाली, वलवण, उकसान, शिरोता धरण परिसर, टायगर, लायन्स, शिवलिंग, मंकी आणि राजमाची पॉईंट, अमृतांजन पूल, कार्ला, भाजे, बेडेस लेणी, लोहगड, विसापूर, तिकोणा गड परिसर या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात हे नियम लागू रहातील, असे पोलिसांनी सांगितले आहे.