सनातन संस्थेच्या वतीने भावपूर्ण वातावणात ‘ऑनलाईन सत्संग सोहळ्या’चे आयोजन
वाराणसी (उत्तरप्रदेश) – कोरोना महामारी आणि चक्रीवादळे ही संकटे आगामी भीषण आपत्काळाची नांदी आहे. अशा स्थितीत ईश्वराची भक्तीच आपल्याला तारणार आहे. अध्यात्म हे पंचमहाभूते आणि ईश्वराची निर्गुण शक्ती यांच्याशी संबंधित आहे. अध्यात्म व्यापक असून विज्ञान अत्यंत मर्यादित आहे. सध्याच्या आपत्काळात चांगली साधना करून ईश्वराचे भक्त बनणे आवश्यक आहे. सध्याचा आपत्काळ हा धर्मकार्यासाठी संपतकाळ आहे. त्यामुळे आपण तन, मन आणि धन यांचा त्याग करून सत्मध्ये रहाण्याचा प्रयत्न करूया, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
‘समाजाने साधना करून आत्मबळ निर्माण करावे’, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या ८ मासांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग श्रृंखलेचे आयोजन करण्यात येते. या श्रृंखलेतील जिज्ञासूंसाठी संस्थेच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या भावपूर्ण सोहळ्याचा लाभ बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश, बंगाल आणि आसाम आदी राज्यांतील अनेक जिज्ञासूंनी घेतला. या वेळी सोहळ्यामध्ये ‘अनुभवकथन’ या सत्रात जिज्ञासूंनी त्यांना आलेल्या अनुभूती सांगितल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुलिका शर्मा यांनी केले.