भारतीय चित्रपटसृष्टीला तिच्या चित्रपटांतील अश्लीलतेवरून दोन शब्द सुनावण्याचे धाडस भारतातील शासनकर्ते कधी करतील का ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान चित्रपटसृष्टी ही ‘हॉलिवूड’ आणि भारतीय चित्रपटसृष्टीकडून अधिकच प्रभावित झालेली आहे. अश्लीलतेचा प्रारंभ हॉलिवूडपासून झाला. नंतर तो भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये पोचला आणि तेथून तो पाकमध्ये आला. अश्लीलतेचा प्रसार करणार्या भारतीय चित्रपटसृष्टीचे अनुकरण करणे पाकिस्तानी चित्रपट निमार्र्त्यांनी बंद केले पाहिजे, असे आवाहन पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. ते येथे एका ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बोलत होते.
PM Imran Khan urges Pakistani filmmakers to promote ‘Pakistaniyat’ and not copy Bollywoodhttps://t.co/67WwlavNaI
— OpIndia.com (@OpIndia_com) June 27, 2021
इम्रान खान पुढे म्हणाले की, पाकिस्तानी चित्रपटसृष्टीने प्रारंभीच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीकडून प्रेरणा घेतली. त्याचा परिणाम पाकच्या संस्कृतीवर दिसू लागला आहे. आपण दुसर्या देशाची संस्कृती स्वीकारू लागलो. मी नव्या चित्रपट निर्मात्यांना एकच सांगू इच्छितो की, तुमची मूळ संस्कृती लोकांना आवडेल. त्यामुळे तुम्ही त्यावर अधिक भर दिला पाहिजे. त्यातून पाकिस्तान चित्रपटसृष्टी जगासमोर एक नवी आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते.