अल्पसंख्यांक मिजो समुदायातील सर्वाधिक मुले असणार्‍या पालकांना १ लाख रुपये प्रोत्साहन म्हणून देणार !

मिझोराम राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडून त्यांच्या मतदारसंघासाठी घोषणा !

उद्या हिंदूंसाठीही अशी घोषणा करावी लागल्यास आश्‍चर्य वाटू नये ! सध्या देशातील ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झालेलेच आहेत, हे लक्षात घ्या !

रॉबर्ट रोमाविया रोयते

ऐझॉल (मिझोराम) – राज्यातील मिझो समाजातील लोकांची संख्या अल्प आहे. त्यात वाढ होण्यासाठी या समाजाचे आणि राज्याचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी त्यांच्या मतदारसंघातील मिजो समाजातील अधिक मुले असणार्‍या दांपत्यांना १ लाख रुपये रोख रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केली आहे; मात्र त्यांनी कमीत कमी किती मुले असणे आवश्यक आहे, हे सांगितलेले नाही. २० जून या दिवशी ‘फादर्स डे’ होता.


त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली. रोख रक्कमेचा खर्च रोयते यांच्या मुलाचे बांधकाम आस्थापन करणार आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार मिझोरामची लोकसंख्या १ कोटी ९१ सहस्र इतकी आहे. येथे प्रति वर्ग किलोमीटर ५२ व्यक्ती रहातात. राष्ट्रीय स्तरावर ही संख्या ३८२ इतकी आहे.