गोवंश हत्याबंदी कायद्याची अजूनही प्रभावी कार्यवाही का होत नाही ? याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !
नांदेड – १५ जून या दिवशी पहाटे ६ वाजता एका गाडीतून कालवड कत्तलीसाठी नेत असतांना पहारा देणार्या पोलिसांनी गाडी थांबवली. गाडीमध्ये अनुमाने ६ मासांच्या वयाची कालवड होती. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अहेमद मोहम्मद कुरेशी (वय ४३ वर्षे) आणि शेख आवेज शेख हैदर (वय २७ वर्षे) यांना अटक केली असून या प्रकरणातील ताहेर, आरीफ आणि एक अनोळखी माणूस पसार झाले आहेत. पोलिसांनी १ लाख रुपयांचे चारचाकी वाहन आणि १० सहस्र रुपयांचा गोवंशिय, असा एकूण १ लाख १० सहस्र रुपयांचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी गणपत पेदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.