‘मांसाहार करणे, ही कृतीच तमप्रधान मानली आहे. ‘दुसर्या जिवाच्या हत्येतून निर्माण झालेले खाद्य देहातील सर्व गुणांचा र्हास करते’, असा धर्मनियम आहे. अशा तमोगुणी आहारातून मनुष्याचे असुरात रूपांतर होऊ शकते. मांसाहारातील तमोगुणी लहरींच्या प्रभावाने देहातील सत्त्वगुणांचा र्हास होतो, परिणामी चांगल्या विचारांचा र्हास होऊन अविचाराने युक्त अशा हिंसक विचारांचा उदय होतो. या विचारांच्या प्रभावाने मनुष्य एखादे दुष्कृत्य करण्यास केव्हाही सिद्ध होतो; म्हणून तमोगुणाने युक्त असा मांसाहार टाळावा.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.३.२००८, सायं. ७.४५)
‘प्राण्यांच्या शरिरात तमोगुण जास्त प्रमाणात असतो. मांसाहार केल्यामुळे त्या जिवातील तमोगुण आपल्या शरिरात येऊन आपल्याला जडत्व प्राप्त होते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नती होण्यात विघ्न उत्पन्न होते. त्यामुळे जीव संसारचक्रात अडकतो.’
– श्रीकृष्ण (श्री. जितेंद्र राठी यांच्या माध्यमातून, सप्टेंबर २००१)