‘मांसाहाराने क्षात्रतेज वाढते का ?’ या एका अधिवक्त्याने विचारलेल्या प्रश्नाचे गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी दिलेले उत्तर येथे देत आहोत.
अधिवक्ता : मांसभक्षणाने शूरत्व उपजून क्षात्रतेज तेजाळून निघते.
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी : शौर्य अन् क्षात्रतेज यांचा मांसभक्षणाशी काही संबंध नाही. मांसभक्षणाने शौर्य नव्हे, तर क्रौर्य येते. शुंग राजघराणे ब्राह्मण आहे. पुष्यमित्र अन् त्याचा पुत्र अग्नीमित्र हे कडवे शाकाहारी ब्राह्मण असूनही तेजस्वी होते. या शाकाहारी पुष्यमित्राने ग्रीकांना तक्षशिलेच्या पार हाकलले. त्यानंतर ग्रीकांनी हिंदुस्थानकडे वाकड्या दृष्टीने पाहिले नाही. पेशवे ब्राह्मण होते. मद्यमांस निवृत्त होते. थोरले माधवराव, रघुनाथराव पेशवे, हरिपंत फडके, पेठे हे पेशव्यांचे कडवे शूर सेनापती ब्राह्मण होते. त्यांनी अटकपार झेंडे नेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्थापलेल्या हिंदु राज्याचे त्यांनी साम्राज्यात परिवर्तन केले.
मांसाहाराचा परिणाम विषसेवनाप्रमाणे होतो !
१. ‘वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने आहाराकरता एखाद्या प्राण्याची हत्या केली जाते, त्या वेळी मृत्यूभयाने त्या प्राण्याच्या शरिरात एड्रीनलिन आणि नॉरएड्रीनलिन हे विषारी रस निर्माण होतात.
२. पशूपक्ष्यांत ट्राचिनॉसिस या रोगाचे (आजाराचे) ट्राचिनेला नामक कृमी असतात. पशूपक्ष्यांचे मांस खाल्ले की, त्याद्वारे माणसाच्या शरिरात गेलेले हे कृमी माणसाच्या आतड्यात मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात. अंड्यांतून निघालेले कृमी रक्तप्रवाहात वहात जातात आणि शरिरातील स्नायूंच्या तंतूत रुतून बसतात. त्यांचे पुढे रेणूत रूपांतर होते. अन्नातून विष पोटात गेले की, जसे घडते, तसेच नेमके इथेही घडते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी