मांसाहार आणि वाईट शक्ती

मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे वाईट शक्ती. या वाईट शक्तींचे भूत, पिशाच, हडळ यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. मांसाहार केल्यावर त्या व्यक्तीचा तमोगुण वाढतो आणि त्याचा अपलाभ उठवत वाईट शक्तींना त्या व्यक्तीला त्रास देणे किंवा त्याच्या शरिरात प्रवेश करणे सोपे जाते.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.