सात्त्विक आहाराचे महत्त्व !

आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥

– श्रीमद्भगवद्गीता १७.८

अर्थ : आयुष्य, सत्त्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती यांची वृद्धी करणारा; स्निग्ध; शरिरामध्ये जास्त काळ रहाणारा अन् मनास आनंददायक असा आहार सात्त्विक वृत्तीच्या लोकांना प्रिय असतो.

आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः । सत्त्वशुद्धौ ध्रुवा स्मृतिः ।
स्मृतिलम्भे सर्वग्रंथीनां विप्रमोक्षः ।

– छांदोग्योपनिषद, अध्याय ७, खंड २६, वाक्य २

अर्थ : सात्त्विक आहाराने सत्त्वशुद्धी होते, सत्त्वशुद्धीने आत्मस्मृती होते. त्यामुळे सर्व वासनाग्रंथी तुटतात आणि मुक्ती मिळते.

राजसिक आहार : याने रजोगुण वाढतो. त्यामुळे वासना उद्दीपित होतात. उत्तेजना आणि कामवासना वाढते.

तामसिक आहार : याने तमोगुण बळावतो. त्यामुळे आळस, अज्ञान, प्रमाद आणि पाप वाढते. व्यक्तीला विचार आणि विवेक करता येत नाही. मानसिक अकर्मण्यता येते.