हुगळी (बंगाल) येथे रुग्ण शेख इस्माईल याचा मृत्यू झाल्याने धर्मांधांनी डॉक्टरला केली मारहाण

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांचे कामबंद आंदोलन !

बंगाल दुसरा बांगलादेश होण्याच्या वाटेवर असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. ही तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना शिक्षा होय !

हुगळी (बंगाल) – येथील पांडुआ ग्रामीण रुग्णालयात इस्माईल शेख नावाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी उपचार करणारे डॉक्टर शिव शंकर राय यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी त्यांना संरक्षण पुरवण्यासह आरोपींना अटक करण्याची मागणी करत कामबंद आंदोलन चालू केल्याने अन्य रुग्णांचे हाल होत आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहे. डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात पोलिसांची कायमस्वरूपी चौकी स्थापन करण्याचीही मागणी केली आहे. मारहाणीच्या या घटनेला २४ घंटे उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही.

भाजपने ‘या घटनेला तृणमूल काँग्रेसचे गुंड उत्तरदायी आहेत’, असा आरोप केला आहे, तर तृणमूल काँग्रेसचे नेते सौगात रॉय यांनी ‘आम्ही डॉक्टरांचे रक्षण करत आहोत’, असे म्हटले आहे. (जर डॉक्टरांचे रक्षण केले जात आहे, तर त्यांना मारहाण कशी होत आहे ? अशा प्रकारचे ढळढळीत खोटे बोलणारे कसा कारभार करत असतील, हे लक्षात येते ! – संपादक)