कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देणार असल्याचे सांगून फसवणूक करणार्‍या दोन धर्मांधांसह चौघांना अटक !

नागरिकांनो, अशा फसव्या लोकांच्या आमिषांना न भुलता वेळीच सावध व्हा !

मुंबई – कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देतो, असे सांगून लोकांचे कोट्यवधी रुपये ‘ऑनलाईन’द्वारे लुबाडणार्‍या दोन धर्मांधांसह चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख, शिवाजी बिनगुडे, श्रीजुगीलाल कर्मी आणि सलीम शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी सांगितले. या टोळीच्या नायजेरियन सूत्रधारासह अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. भारतातील अनेक राज्यांमध्ये या टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी बनावट कागदपत्रे, सीमकार्ड आणि खोटी कागदपत्रे देऊन उघडलेली ६४ बँक खात्यांची माहिती जप्त केली आहे. या खात्यांवरून आरोपींनी साडेपाच कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हरियाणा येथील एका मंत्र्याच्या पुतण्याचीही त्यांनी फसवणूक केली आहे.