सांगली येथे १०० फुटी रस्त्यावरील ‘भोबे’ गटारीतून १२ टन कचरा काढला

१०० फुटी रस्त्यावरील ‘भोबे’ गटारीतून काढण्यात आलेल्या कचर्‍याची पहाणी करतांना उपायुक्त राहुल रोकडे (मध्यभागी) आणि अन्य

सांगली, २६ मे – शहरातील १०० फुटी रस्त्यावरील मुख्य असणार्‍या ‘भोबे’ गटारीतून आतापर्यंत १२ टन कचरा काढण्यात आला आहे. या गटारीच्या स्वच्छतेचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा काढण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून नाले सफाईच्या अंतर्गत ‘भोबे’ गटार स्वच्छता मोहीम जोरदार राबवण्यात येत आहे.