मुंबई – ‘कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पहाता मी माझा विवाह पुढे ढकलला आहे. ‘विवाह करून देश सोडून जावे’, असे मला अजिबात वाटत नाही. अशा बिकट परिस्थितीत मी आनंदी कशी राहू ? विवाहाचा उत्सव (सेलिब्रेशन) कसा साजरा करू ? जेव्हा माझ्या देशातील लोक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडत आहेत, लोक दु:खात आहेत, तेव्हा माझे नवीन आयुष्य चालू करण्यापेक्षा गरजू आणि पीडित यांना साहाय्य करणे, हे अधिक महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. यासाठी मी सध्या तरी विवाह न करता तो पुढील वर्षी करणार आहे’, अशी माहिती अभिनेत्री वैशाली टक्कर यांनी दिली.
Exclusive – Sasural Simar Ka fame Vaishali Takker postpones wedding to next year; says ‘Not in a mood for any celebrations when people in my country are dying’ https://t.co/jlHMKu71no
— ETimes TV (@ETimesTV) May 10, 2021
अभिनेत्री वैशाली टक्कर यांचा विवाह आधुनिक वैद्य अभिनंदन सिंह हुंडलसमवेत होणार होता. वैशाली म्हणाल्या की, सध्या मी विद्यार्थ्यांच्या एका गटासमवेत काम करत आहे. हा गट कोरोना काळात गरजूंना साहाय्य करत आहे. आम्ही सर्वजण गरजूंना अन्न आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे काम करत आहोत.