सर्व कर्मचार्यांची रॅपिड टेस्ट करण्याची सूचना
सावंतवाडी – कोरोनाचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) असतांनाही एका बँकेचा कर्मचारी कामावर आल्याचे येथील नगरपरिषदेच्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेचे काम बंद करून कार्यालयाचे निर्जंतुकीकरण केले. या बँकेतील सर्व कर्मचार्यांची ‘रॅपिड टेस्ट’ करावी, अशा सूचना नगरपरिषदेने बँक व्यवस्थापनाला दिल्या आहेत.
एका कर्मचार्याने कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तपासणी केली होती. त्यानंतर नगरपरिषद कार्यालयातून त्या कर्मचार्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता; मात्र संपर्क झाला नाही. १० मे या दिवशी तो कर्मचारी बँकेत काम करत असल्याचे निदर्शनास आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३७२ नवीन रुग्ण : ४ जणांचा मृत्यू
उपचार चालू असलेले रुग्ण : ५ सहस्र ११२
बरे झालेले एकूण रुग्ण: ११ सहस्र ७०८
मृत्यू झालेले एकूण रुग्ण ४०८
आतापर्यंतचे एकूण रुग्ण : १७ सहस्र २३४