कृतज्ञ आम्ही तव चरणी महर्षि । गुरुदेव अवताररूपे दर्शन देती ।।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे महाविष्णुचाच अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्ट्यांमध्ये लक्षावधी वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे. साधकांना महाविष्णुतत्त्वाचा लाभ होण्यासाठी आणि महर्षींच्या आज्ञेनुसार गुरुदेवांनी त्यांच्या पूर्वी झालेल्या जन्मोत्सवांच्या निमित्ताने अत्यंत शारीरिक त्रास होत असतांनाही श्रीविष्णुच्या विविध रूपांत दर्शन दिले. परात्पर गुरु डॉक्टरांचे हे रूप साधकांनी हृदयमंदिरात साठवले. साधक ते पाहून भावविभोर झाले. त्या विष्णुमय क्षणांचे पुनर्स्मरण होण्यासाठी हे पृष्ठ श्रीमन्नारायणस्वरूप गुरुचरणी समर्पित करत आहोत !

श्री महाविष्णूचा डोलोत्सव

परात्पर गुरु डॉ. आठवले

पापमुक्ती करणारा डोलोत्सव !

‘श्रीविष्णुला झोपाळ्यावर बसवून त्याची स्तुती करत हळुवार झोपाळा हलवणे’, याला डोलोत्सव म्हणतात. भगवान श्रीविष्णूच्या डोलोत्सवाचा उल्लेख पद्मपुराणात करण्यात आला आहे. ‘झोपाळ्यावर झोके घेणार्‍या श्रीकृष्णाचे दक्षिणाभिमुख होऊन दर्शन घेण्याने पापांच्या भारापासून मुक्ती मिळते’, असे सांगतात.

मथुरा, वृंदावन, अयोध्या, द्वारका, डाकोर (गुजरात) आदी श्रीकृष्ण मंदिरांत, तर तिरुपती बालाजी मंदिरातही नियमितपणे श्रींचा डोलोत्सव साजरा करण्यात येतो.

विष्णुतत्त्व जागृत करणारा डोलोत्सव !

श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा डोलोत्सव करण्याविषयी महर्षींनी सांगितले की, ‘साधकांनी केलेल्या स्तुतीमुळे आणि गुरूंच्या झोपाळ्याला भावपूर्ण झोका दिल्यामुळे श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व हळूवारपणे जागृत होऊन विश्वातील सर्व साधकांना त्यांच्या चैतन्याचा लाभ होईल.’

प्रत्यक्षातही झोपाळ्यावर बसलेल्या परात्पर गुरुदेवांच्या दर्शनाने साधकांना सुंदर अनुभूती आल्या आणि श्रीविष्णूप्रतीचा भक्तीभाव जागृत झाला.

भक्तवत्सल श्रीकृष्णरूप

 

हे श्रीकृष्णा, अर्जुनाप्रमाणे आमचीही भक्ती वृद्धींगत व्हावी, ही प्रार्थना !


जगत्पालक श्री महाविष्णुरूप

 

हे जगत्पालक महाविष्णु, काळ कितीही कठीण आला, तरी आमची श्रीगुरूंवर दृढ श्रद्धा रहावी !


कृपाळू श्री सत्यनारायणरूप

 

हे श्री सत्यनारायणा, आपली कृपादृष्टी आमच्यावर सदैव रहावी, ही प्रार्थना !