सनातनची ग्रंथमालिका : हिदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना

स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि ‘हिंदु राष्ट्र’ ही तेजस्वी संकल्पना झाकोळून गेली. सद्यस्थितीत राष्ट्राच्या संदर्भातील सर्व समस्यांवर एकच कायमस्वरूपी उत्तर आहे अन् ते म्हणजे, धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र-स्थापना’ ! याविषयी दिशादर्शन करणारी ग्रंथमालिका !

हिंदु राष्ट्र का हवे ?

‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’सारखे आदर्श राज्य ! सध्याच्या प्रचलित राज्यपद्धती, त्यांतील त्रुटी आदींच्या अभ्यासाद्वारे हिंदु राष्ट्राचे श्रेष्ठत्व सांगणारा अन् ते स्थापन व्हावे, यासाठी कृतीला प्रवृत्त करणारा ग्रंथ !

हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण

भारतात धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्राचा विचार असंवैधानिक आहे’, ‘हिंदु राष्ट्रामुळे भारताचा ‘हिंदु पाकिस्तान’ होईल’ आदी आक्षेप घेतले जात आहेत. त्यांचे खंडण, तसेच ‘भारत स्वयंभू ‘हिंदु राष्ट्र’ कसे आहे’ याविषयीचे विवेचन !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा

हिंदु समाजातील विविध घटक, हिंदु संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आदींनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने संतांच्या आध्यात्मिक बळाचे महत्त्व ओळखून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी करायच्या कार्याची दिशा देणारा ग्रंथ !

ईश्वरी राज्याची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केल्याप्रमाणे ‘धर्माधिष्ठित आदर्श राष्ट्राची उभारणी’, हाच आजच्या सर्व समस्यांवरील उपाय आहे. हे ध्येय कसे साधायचे, ईश्वरी राज्यातील अर्थ आणि न्याय प्रणाली कशा असतील इ. विषयी मार्गदर्शनपर ग्रंथ !

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती

राष्ट्राच्या उभारणीसाठी सर्वांनी संघटित होऊन लोकशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता इ. दुष्प्रवृत्तींच्या विरोधात वैधरित्या (कायदेशीरपणे) कसा लढा द्यावा, याविषयी दिशादर्शन करणारा ग्रंथ !

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३ १५३१७