दिवसभरात कोरोनाबाधित २ सहस्र ३२१ नवीन रुग्ण

पणजी – राज्यात २६ एप्रिल या दिवशी कोरोनाबाधित नवीन रुग्णसंख्येने पुन्हा नवीन उच्चांक स्थापित केला आहे. एकाच दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ३२१ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाविषयक ६ सहस्र ७७२ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३४.२७ टक्के आहे. २५ एप्रिलला कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची टक्केवारी ३९ टक्क्यांवरून घटून ती ३४ टक्क्यांवर आलेली आहे.

मडगाव, पर्वरी आणि कांदोळी येथे सर्वाधिक म्हणजे १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात मडगाव १ सहस्र ४१८, पर्वरी १ सहस्र २७३ आणि कांदोळी १ सहस्र ३८० या आरोग्य केंद्रांत सर्वाधिक प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. पणजी ९६८, कुठ्ठाळी ८९०, म्हापसा ८७८, फोंडा ८६३, वास्को ७४५, चिंबल ५२९, कासावली ५११, शिवोली ५००, सांखळी ४२८, डिचोली ४२४, पेडणे ३६२ आणि खोर्ली ३०९ ही आरोग्यकेंद्रे त्या खालोखाल रुग्ण असलेली आहेत.