‘८.१०.२०२० या दिवशी मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधून काढतांना मला हनुमानाचा नामजप आला. ‘ॐ ॐ श्री हनुमते नमः ॐ ॐ ।’ हा नामजप करायला आरंभ केल्यावर मला ‘माझ्या शरिराच्या मागून पुष्कळ जड बाहेर ओढले जात आहे, तसेच माझे डोके उलटे झाले आहे’, असे वाटत होते. त्यामुळे मी लगेच भाववृद्धीसाठी प्रयोग चालू केला. मी हनुमानाच्या पवित्र चरणांवर माझे डोके ठेवून नामजप करू लागले. अचानक मला माझे डोके हलके वाटू लागले. मी नामजप चालूच ठेवला. हळूहळू माझे शरीर आणि मन चैतन्यमय झाले. मला पुष्कळ शांत वाटले आणि माझा नामजप अधिक एकाग्रतेने होऊ लागला. पुढील दोन दिवस मला हीच अनुभूती आली. माझा नामजप सहज आणि अडथळ्यांविना होऊ लागला. मला आतून पुष्कळ शांत वाटत होते.’
– सौ. अश्विनी राहुल माटे, मिनिएपोलीस, मिनेसोटा, अमेरिका.
(ऑक्टोबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |