१. मृत्यू झालेले एकूण रुग्ण २४९
२. दिवसभरातील कोरोनाबाधित २३७
३. उपचार चालू असलेले रुग्ण २ सहस्र ८८९
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १० सहस्र ७६३
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १० सहस्र कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १० सहस्र कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठप्प झालेली लसीकरण मोहीम आता पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. गेले २ दिवस जिल्ह्यातील कोरोना लसीकरण केंद्रावरील लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यातील लसीकरण ठप्प झाले होते. जिल्ह्यातील ५६ लसीकरण केंद्रांवर या लसीचे वितरणही करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी दिली. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी लसीकरण केंद्र चालू करण्यात आली आहेत.
खारेपाटण बाजारपेठ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
कणकवली – तालुक्यातील खारेपाटण गावात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २२ ते २९ एप्रिल या कालावधीत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २२ एप्रिल या बंदच्या पहिल्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. ‘यासाठी स्थानिक जनता आणि व्यापारी यांचे पूर्ण सहकार्य लाभले’, अशी माहिती ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांनी सांगितले.