१. नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हनुमानाच्या पाठीवर बसून आकाशात भ्रमण करत आहेत’, असे दिसणे
‘२.४.२०२० या श्रीरामनवमीच्या दिवशी साडेअकरा वाजता मी नामजपाला बसले. तेव्हा मला दिसले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत हनुमान आला आहे. ते दोघे काहीतरी बोलत आहेत. नंतर हनुमानाने परात्पर गुरुदेवांना त्याच्या पाठीवर बसवले आणि आकाशात उड्डाण केले. त्या वेळी परात्पर गुरुदेव श्रीरामाच्या वेशात होते. त्यांच्या डोक्यावरील मुकुट चमकत होता. ‘एक सुंदर रूप आकाशातून संपूर्ण विश्वात भ्रमण करत आहे’, असे मला दिसत होते. ते भारतात भ्रमण करतांना भारताच्या एका सरहद्दीवर गेले. त्यांना ‘तेथे जाऊ नये’, असे वाटले; म्हणून ते तेथूनच मागे फिरले. नंतर ते पुन्हा रामनाथी आश्रमात परत आले.’
२. श्रीरामाचा पाळणा ऐकतांना ‘श्रीराम बालकरूपात पाळण्यात खेळत असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पाळणा हलवत आहेत’, असे दिसणे
नामजपाची वेळ संपल्यावर मला श्रीरामाचा पाळणा ऐकू आला. तेव्हा मला श्रीराम बालकरूपात पाळण्यात हसत खेळत असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पाळणा हलवत आहेत अन् दोघी पुष्कळ हसत आहेत’, असे दिसले. त्या तिघांच्या हास्यातून पुष्कळ चैतन्य बाहेर पडून ते सर्वत्र प्रक्षेपित होत होते.’ मला हे दृश्य पहातांना पुष्कळ आनंद मिळत होता.
‘हे गुरुदेवा, आपण मला हे दृश्य दाखवून आनंद दिला. त्याविषयी मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– एक साधिका सनातन आश्रम, गोवा. (२.४.२०२०)