साधिकेची भावसत्संग घेतांना झालेली मनाची स्थिती आणि तिला शिकायला मिळालेली सूत्रे

१. भावसत्संगाची सिद्धता करतांना गुरुदेवांनी मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांविरुद्ध लढायला शिकवल्याने मन हलके होऊन आनंद निर्माण होणे

​‘मी मला होणार्‍या त्रासांवर उपाय करते, तरी मला भावसत्संगाच्या दिवशी पुष्कळ मानसिक आणि आध्यात्मिक त्रास चालू होतात. मला इतका त्रास होतो की, ‘भावसत्संग कसा घ्यायचा ?’, हे माझ्या लक्षात येत नाही. समष्टीला लाभ होण्यात मी न्यून पडते; म्हणून माझ्या मनात ‘भावसत्संग घ्यायला नको’, असे नकारात्मक विचार येतात. भावसत्संगाची सिद्धता चालू होते, त्या वेळी माझ्या मनात गुरुदेव ‘त्रासावर मात करून पुढे जायचे आहे’, असा विचार घालतात आणि त्यासाठी प्रयत्न करवून घेतात. तेव्हा माझे मन हलके होऊन आनंद निर्माण होतो आणि त्रास न्यून होतात.

२. भाव निर्माण करण्याचे एक साधन म्हणजे भावसत्संग !

​भावसत्संग घेतांना आपल्यात भाव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सतत देवाच्या अनुसंधानात राहून प.पू. गुरुदेवांचे स्मरण केले, तरच आपल्याकडून भाववृद्धीसाठी प्रयत्न होतात. प्रत्येक प्रसंगात ईश्‍वराला पहाण्यास ईश्‍वरच शिकवत असतो. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात भावजागृतीचे प्रयत्न होऊ लागतात आणि ‘भगवंतच आमच्याकडून भावजागृतीसाठी प्रयत्न करून घेत आहे’, असा कृतज्ञतेचा भाव निर्माण होतो.

३. भावसत्संग घेतांना ईश्‍वराने दिलेला सर्वांत मोठा उपहार, म्हणजे समष्टीतून भावसत्संग घेणार्‍यांची भाववृद्धी होणे

आम्ही भावसत्संग घेतो. तो घेतांना ‘साधकांची भावजागृती होते का ?’ नाही झाली, तर ‘मी कुठे न्यून पडते ?’, असा कर्तेपणा असायचा. एकदा भावसत्संग घेतांना इतर साधकांच्या भावामुळे आमच्यात भाव जागृत होत होता. तेव्हा ‘साधकांच्या भावामुळे आपल्यात भाव निर्माण होतो’, हे लक्षात आले. आपल्याला भगवंताने दिलेला भावसत्संग, म्हणजे गुरुदेवांनी आमच्यावर केलेला कृपेचा वर्षाव आहे; म्हणून गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

भावसत्संग म्हणजे भावाची दीप्ती (तेज) ।

भावसत्संग म्हणजे कलियुगातील कल्पवृक्ष ।

भावसत्संग म्हणजे कलियुगात मागेल ते देणारी कामधेनू ।

भावामुळेच ईश्‍वरापर्यंत पोचण्याची ही संजीवनी आहे ।

​ईश्‍वराने दिलेल्या या भावसत्संगाच्या माध्यमातून आपल्याला हे गुरुदेवांनीच शिकवले आणि अनुभवण्यास दिले. त्यामुळे श्री गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. तारा, बेंगळुरू (१.११.२०१७)