गुरु श्रेष्ठ कि ईश्वर श्रेष्ठ ।
शिष्य म्हणती गुरु श्रेष्ठ ।
भक्त म्हणती ईश्वर श्रेष्ठ ॥ १ ॥
गुरु हे तर ईश्वराचे सगुण रूप ।
ईश्वर हा तर गुरूंचे निर्गुण रूप ॥ २ ॥
शिष्य हा मानव देहधारी ।
त्यासी आवडे गुरु जो सगुण देहधारी ॥ ३ ॥
भक्त तल्लीन नामी ईश्वराच्या ।
भुलूनी देहा वाट पाहे ।
मिलनाची ईश्वराशी ॥ ४ ॥
भक्तराज बाबा म्हणती ।
सगुण-निर्गुण नाही भेदाभेद ।
सगुण-निर्गुण या तर नाण्याच्या दोन बाजू ।
गुरु-ईश्वर याही नाण्याच्या दोन बाजू ॥ ५ ॥
शिष्य साधना करता करता ।
निर्गुणाकडे वाटचाल करी ।
भक्त भक्ती करता करता ।
ईश्वरच होऊन जाई ॥ ६ ॥
गुरु सगुणातून निर्गुणाकडे जाई ।
ईश्वर भक्तभेटीसाठी सगुणे अवतारी ।
राम, कृष्ण अवतार जयंत धारण करी ।
आणि गुरूंकडून ज्ञानार्जन करी ॥ ७ ॥
गुरुही श्रेष्ठ, ईश्वरही श्रेष्ठ ।
गुरु आणि ईश्वर हे तर अवघे एकच रूप ।
गुरु आणि ईश्वर हे अनादि अनंत ।
जीवन करती आनंदीआनंद ॥ ८ ॥
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे ही स्फुरलेली रचना त्यांच्याच चरणी अर्पण !’
– आधुनिक वैद्य मिलिंद खरे, लेस्टर, इंग्लंड (२८.६.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |