१. गोध्रा येथे धर्मांधांनी लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा जळून मृत्यू
‘नुकताच ‘द साबरमती रिपोर्ट’ हा हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला. हा चित्रपट ५९ कारसेवकांच्या हत्याकांडावर आधारित आहे. रेल्वेच्या बोगी क्रमांक ‘एस् ५’ आणि ‘एस् ६’ यांमध्ये २७ महिला, १० मुले (एक मूल तर २ वर्षांचे होते.) आणि उर्वरीत रामभक्त होते. ते रामभक्त अयोध्येवरून कर्णावतीला परत येत होते. गोध्रा रेल्वेस्थानक येण्यापूर्वी धर्मांधांनी साखळी ओढून गाडी थांबवली. आक्रमणकर्त्यांनी आत पेट्रोल, डिझेल यांसारखे ज्वलनशील पदार्थ फेकले. नंतर दोन्ही डब्यांची दारे बाहेरून बंद करून आग लावण्यात आली. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर आग पसरली आणि ५९ रामभक्तांचा जळून कोळसा झाला. या सर्व गोष्टी जगासमोर येऊ नये; म्हणून विशेषत: इंग्रजी वृत्तसंस्थांनी त्याला अपघाताचे स्वरूप दिले; पण सत्य जगासमोर आलेच. परिणामी गुजरातमध्ये २७.२.२००२ या दिवसापासून भीषण दंगल उसळली. या रामभक्तांच्या हत्याकांडाच्या विरोधात प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते आणि ती उमटली. त्यानंतर ‘हिंदूंच्या आक्रमणात मुसलमान समाजाचे लोक अत्याचाराला फसले’, असे भासवण्यात आले. तत्पूर्वीचे वार्तांकन करायला आलेल्या एका इंग्रजी दैनिकाच्या सत्शील वार्ताहराला नोकरीतून काढून टाकण्यात आले. त्या वेळेस एका विशिष्ट पत्रकार वर्गाचा केंद्र सरकारच्या वर्तुळात वावर होता. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांनी १० ते १२ वर्षे गुजरात दंगलीवरून विशेष चर्चासत्रे चालू ठेवली. कारसेवकांचे हत्याकांड जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि एक कथानक पसरवण्यात आले. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, पुरोगामी, इतिहासतज्ञ, चित्रपट निर्माते अन् दिग्दर्शक, कलावंत यांनी फार मोठ्या प्रमाणावर भाग घेऊन धर्मांध मुसलमान कसे शांतीप्रिय आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे गोध्रा हत्याकांडाचे सत्य जगासमोर येणे आवश्यक होते. ती उणीव या चित्रपटाने पूर्ण केली.
२. गुजरात दंगलप्रकरणी ३१ आरोपी दोषी आणि ६३ धर्मांध निर्दोष सिद्ध
गुजरात दंगलीप्रकरणी नानावटी आयोगाने चौकशी केली. नानावटी आयोगाने १६८ पानांचा अहवाल गुजरात सरकारला सादर केला. त्यात भयावह सत्य समोर आले. धर्मांधांनी २६.२.२००२ या दिवशी १४० लिटर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपातून मिळवून साठा करून ठेवला होता. या हत्याकांडाचा सूत्रधार गोध्रा येथील मौलवी हुसेन हाजी इब्राहिम उम्रजी होता. यात त्याला रेल्वेचा कर्मचारी नानुमिया याने सहकार्य केले होते. त्याला नंतर बडतर्फ करण्यात आले. निष्पाप ५९ रामभक्तांचा दोष एवढाच होता की, त्यांनी अयोध्येच्या रामलल्लाचे दर्शन घेतले होते. भारत देश वर्ष १९४७ ला स्वतंत्र झाला; मात्र हिंदूंना स्वातंत्र्य मिळण्यास वर्ष २०१४ उजाडले.
गुजरात सरकारने नानावटी आयोग नेमला होता. त्यामुळे केंद्रातील त्या वेळच्या काँग्रेस आघाडी सरकारने अल्पसंख्यांक समाजाला वाचवण्यासाठी न्यायमूर्ती उमेशचंद्र बॅनर्जी आयोग नेमला. या अहवालाने ‘गोध्राची घटना अपघात होता’, असे सांगितले. नानावटी आयोगाचा अहवाल ग्राह्य धरून सत्र न्यायालयाने (हुसेन इब्राहिम याच्यासह) ३१ आरोपींना दोषी ठरवले आणि शिक्षा झाल्या. या शिक्षा उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायलयात येथे कायम राहिल्या. रेल्वेमध्ये केंद्रीय रेल्वे पोलीस दलात काम करणार्या रझाक आणि नानुमिया या कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले. पुराव्याअभावी ६३ धर्मांध मुसलमानांना निर्दोष सोडावे लागले.
३. हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारे चित्रपटाचे निर्माते आणि कलावंत यांचे अभिनंदन !
या चित्रपटात दाखवण्यात आले की, भारतात ३१ कोटी मुसलमान रहातात. ते त्यांचे काम, व्यवसाय, उद्योगधंदे व्यवस्थित करतात. खंडप्राय भारत देशात केवळ एखाद्या ठिकाणी मुसलमानांना मारहाण झाली, तर ‘इस्लाम खतरेमें’चा कांगावा केला जातो. याउलट हिंदूंच्या गणेशमूर्ती विसर्जनावर दगडफेक केली जाते, गणेशभक्तांवर गोळीबार केला जातो आणि त्यांच्यावर अॅसिड (आम्ल) बाँब टाकले जातात. हेच दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळीही घडते. यावर्षी तर दिवाळीला फटाके फोडणे, दिवे लावणे आणि रोषणाई करणे यांनाही धर्मांधांनी जागोजागी विरोध केला. हे वास्तव असतांना भारतात अल्पसंख्यांक समाजावर आक्रमण होत असल्याचे दाखवले जाते.
‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात या सर्व गोष्टी सविस्तर दाखवण्यात आल्या. हा चित्रपट प्रत्येक हिंदूने पाहिला पाहिजे. केवळ श्रीराममंदिर होण्यासाठी ५०० वर्षे वाट पहावी लागली. एवढेच नाही, तर त्यासाठी सहस्रो रामभक्तांना बलीदान करावे लागले. अलीकडे द कश्मीर फाइल्स, द केरल स्टोरी, हमारे बाराह, अजमेर ९२ असे काही चित्रपट प्रसिद्ध झाले. त्यांच्या माध्यमातून धर्मांधांची दुष्कृते जनतेच्या समोर आली.
वर्ष २००४ ते २०१४ या काळात हिंदुत्वनिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना खलनायक दाखवण्यात आले. त्यांना ‘मौत के सौदागर’ (मृत्यूचा व्यापारी) असे हिणवले गेले. जगभरात त्यांची मानहानी केली, काही भारतीय पत्रकारांनी खोटे कथानक चालवले. हे आता काही प्रमाणात हिंदूंच्या लक्षात येत आहे. ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात वर्ष २००२ च्या दंगलीचे ‘खोटे कथानक’ फार चांगल्या पद्धतीने उघड करण्यात आले. त्यामुळे हा चित्रपट निर्माण करणारे कपूर कुटुंबीय आणि त्यात सहभागी झालेले कलावंत या सर्वांचे अभिनंदन करावेसे वाटते; कारण त्यांनी सत्य जनतेसमोर आणले आहे.’ (२०.११.२०२४)
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय