‘किती वर्णावी महती आपली श्री गुरुमाई ।
सहजभाव असे आपला सद्गुरु स्वातीताई ।
निखळ हास्यातून चैतन्य देती सद्गुरु ताई ॥ १ ॥
स्वकृतीतून नकळत शिकवती आदर्श आचरण ।
भावभक्तीचे असे रूप मूर्तीमंत ।
ज्यांचे दर्शन घेण्या साधक अन् समाज असती आतुर ।
ज्यांची वाणी ऐकण्या सर्व अवयव असती आतुर ॥ २ ॥
स्वा – स्वानंदूनी निनादती तेजोमय प्रकाश ।
ती – तिमिरातूनी तेजाकडे मार्ग दाविती ।
गुणगान गाण्या त्यांचे पंचतत्त्वेही एकरूप होती ।
पंचतत्त्वांच्या तेजातून साक्षात् श्री दुर्गामाताच प्रगटती ।
अशा आहेत आपल्या सद्गुरु स्वातीताई ॥ ३ ॥
– सौ. सुनीता पंचाक्षरी, सोलापूर (२५.३.२०२०)