पू. (पं.) केशव गिंडे यांनी ‘अहिर भैरव’ या रागावर वाजवलेल्या बासरीची धून ऐकल्यावर कु. मधुरा भोसले त्यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण !

पू. (पं.) केशव गिंडे यांनी ‘अहिर भैरव’ या रागावर वाजवलेल्या बासरीची धून ऐकल्यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांच्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण !

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘९.४.२०१९ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता ६.३६ मिनिटांसाठी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्वनीवर्धकावर (स्पीकरवर) पुण्याचे पू. (पं.) केशव गिंडे यांनी वाजवलेल्या बासरीची धून लावली होती. ही बासरीची धून ऐकल्यावर मला आलेल्या अनुभूती आणि देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण यांची सूत्रे येथे देत आहे.

पू. (पं.) केशव गिंडे

१. बासरीवादन ऐकतांना दिसलेले दृश्य 

अ. ‘बासरीवादनातून सूर्योदयाचे वर्णन होत आहे’, असे मला जाणवले. त्यामुळे सूर्योदय होऊन सकाळचे वातावरण निर्माण झाल्याचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर आले.

आ. ‘पहाटेच्या वेळी गोकुळात यमुनेच्या तिरावर एकांतात बसलेला श्रीकृष्ण राधेला आळवण्यासाठी बासरी वाजवण्यात मग्न आहे’, असे दृश्य मला दिसले.

इ. नेहमीपेक्षा लांब असणार्‍या एका लांब बासरीच्या सप्तछिद्रांतून प्रथम सप्तस्वर आणि त्याबरोबर सप्तरंग येतांना दिसले. त्यानंतर बासरीतून निळा, नंतर पिवळा आणि शेवटी पांढरा प्रकाश मंद गतीने वातावरणात प्रक्षेपित होतांना दिसला.

ई. बासरीतून निळसर-पांढर्‍या रंगाच्या पाण्याचा प्रवाह संथ गतीने वाहून श्रोत्यांचे शरीर आणि मन यांना स्पर्श करत असल्याचे दृश्य मला दिसले अन् त्याचा परिणाम माझ्या देहावर, तसेच मनावर होऊन मला थंडावा जाणवला.

बासरीवादन करतांना पू. (पं.) केशव गिंडेकाका

२. बासरीवादन ऐकतांना मनाला आलेली अनुभूती

अ. बासरीच्या स्वरांमध्ये आर्तभाव जाणवला आणि मनामध्ये ईश्‍वराप्रतीची ओढ अन् उत्कंठा निर्माण झाली.

आ. बासरीचे स्वर अंतर्मुख करणारे जाणवले. त्यामुळे माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून होऊन माझ्या मनामध्ये आध्यात्मिक गंभीरता (अंतर्मुखता) निर्माण झाली.

इ. सलग ६ मिनिटे बासरीवादन ऐकल्यावर मनाचे कार्य मंदावून मनाला शांतीची अनुभूती येते.

ई. ‘मनामध्ये अनावश्यक विचार वाढल्यावर ते न्यून करण्यासाठी ‘अहिर भैरव’ या रागातील बासरीचा नाद ऐकणे उपयुक्त ठरेल’, असे जाणवले.

कु. मधुरा भोसले

३. बासरीवादन ऐकतांना शरिरावर झालेला परिणाम

अ. बासरीचे स्वर संथ गतीने चालू होते. तेव्हा त्यांमध्ये निर्गुण चैतन्य अधिक प्रमाणात प्रवाहित होतांना जाणवले. या चैतन्याच्या लहरी समुद्राच्या संथ गतीने वाहणार्‍या लाटांप्रमाणे कार्यरत असल्याचे जाणवले.

आ. बासरीच्या संथ गतीने प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींचा स्पर्श जेव्हा माझ्या देहाला झाला, तेव्हा मला शीतलता जाणवली आणि मनाला शांतीची अनुभूती आली.

इ. सलग ३ मिनिटांपेक्षा अधिक काळ बासरीवादन ऐकल्यावर, बासरीतून संथ गतीने प्रक्षेपित होणार्‍या नादलहरींच्या लयीशी माझ्या हृदयाचे ठोके आणि श्‍वास यांची गती जुळल्याचे जाणवले आणि ‘मी बासरीच्या नादाशी एकरूप झाले आहे’, असे  जाणवले.

ई. ‘अहिर भैरव’ या रागातील बासरीचा नाद उच्च रक्तदाब आणि मनाचा उद्रेक न्यून करण्यासाठी उपयुक्त आहे’, असे मला जाणवले.

(‘हे बरोबर आहे. ‘अहिर भैरव’ हा राग उच्च रक्तदाब आणि मानसिक तणाव न्यून करण्यासाठी उपयोगात आणला जातो. – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय)

४. बासरीवादनाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

अ. ‘ज्या बासरीवर ही धून वाजवली, ती बासरी सामान्य बासरी नसून दैवी बासरी आहे’, असे जाणवले. या बासरीचे श्रीकृष्णाच्या बासरीशी १० टक्के साम्य जाणवले.

आ. बासरीतून ‘अहिर भैरव’ या रागाचे स्वर उत्तम लयीत व्यक्त झाल्यामुळे बासरीवादन आध्यात्मिकदृष्ट्या परिणामकारक जाणवले.

इ. बासरीचा नाद पश्यंती वाणीचा असल्याचे जाणवले. त्यामुळे हे बासरीवादन ऐकतांना पुष्कळ प्रमाणात नामजपादी उपाय होऊन वाईट शक्तींचा त्रास न्यून होण्यास साहाय्य मिळते.

(बासरीचा नाद पश्यंती वाणीचा असतो, असे आतापर्यंत कळलेले नाही आणि तसा कुठे उल्लेख आलेला नाही. त्यामुळे ‘ते कसे अभ्यासावे’, हे कळत नाही. – कु. तेजल पात्रीकर)

ई. बासरीच्या नादामुळे व्यष्टी स्तरावर चित्ताची आणि समष्टी स्तरावर वातावरणाची शुद्धी होते.

उ. बासरीच्या स्वरांतील सात्त्विकतेमुळे देह आणि मन यांतील रज-तमात्मक लहरींचे प्रमाण हळूहळू न्यून होऊन देह अन् मन सात्त्विक बनतात.

ऊ. बासरीवादनामुळे सभोवती कृष्णलोकातील वातावरण निर्माण होते.

ए. बासरीचा नाद ऐकल्यामुळे श्‍वासाची गती संथ होऊन शरिरातील विविध नाड्यांची शुद्धी होते आणि नंतर चंद्रनाडी चालू होते.

ऐ. बासरीचा नाद सलग २० मिनिटे ऐकल्यावर बासरीतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म प्रकाश आणि सूक्ष्म नाद यांच्या एकत्रित लहरींमुळे श्रोत्यांची सप्तचक्रे (मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्रार), पंचप्राण (प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान), पंचकोश (अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय) आणि पंचदेह (स्थूलदेह, प्राणदेह, मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह) यांची शुद्धी होते.

५. पू. (पं.) केशव गिंडे यांनी वाजवलेल्या बासरीच्या धुनीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक आणि समष्टी स्तरांवर, म्हणजे प्रायोगिक स्तरावर होणारे विविध प्रकारचे लाभ

६. सारांश

बासरीवादन करणारे वादक संत असल्यामुळे त्यांच्या बासरीवादनात कुठेच रजोगुण किंवा बहिर्मुखता जाणवली नाही. या उलट त्यांनी केलेले बासरीवादन पुष्कळ सात्त्विक, चैतन्य आणि अधिकाधिक अंतर्मुख करणारे, म्हणजे साधनेसाठी अत्यंत पोषक असल्याचे जाणवले. घरामध्ये बासरीची धून लावल्यामुळे घरातील वातावरण सात्त्विक बनते. त्यामुळे साधकांनी या बासरीच्या धुनीचा लाभ व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर करून घ्यावा.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने आम्हाला संतांनी वाजवलेल्या बासरीची धून ऐकण्याची दुर्लभ संधी लाभली आणि द्वापरयुगातील श्रीकृष्णाने केलेल्या बासरीवादनाची अंशात्मक अनुभूती अनुभवण्याची संधी मिळाली, यासाठी भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप असणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी ही मधुरागोपी कृतज्ञतेची भावपुष्पे वहाते. ती त्यांनी स्वीकारून आम्हा साधकांवर अखंड कृपावर्षाव करत रहावे, हीच कृष्णमय गुरुदेवांच्या चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, गोवा. (९.४.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक