अहवाल नेमका योग्य कुणाचा हे जनतेला समजले पाहिजे. ज्यांच्याकडून चूक झाली असेल, त्यांना शिक्षा द्यायला हवी, ही अपेक्षा !
नगर – येथील एका व्यक्तीला खासगी प्रयोगशाळेने कोरोनाबाधित ठरवले, तर त्याच दिवशी त्याच व्यक्तीचा सरकारी रुग्णालयातील अहवाल मात्र ‘निगेटिव्ह’ आला. यातील संशयामुळे कोणत्या अहवालावर विश्वास ठेवायचा, हा प्रश्न पडला. या संदर्भात चौकशी करून चुकीचा अहवाल देणार्या खासगी प्रयोगशाळेची नोंदणी रहित करून दोषींवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने अपर जिल्हाधिकारी पी.एल्. सोरमारे यांच्याकडे करण्यात आली. खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळण्याचे प्रमाण अधिक कसे ?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.