१. जवळीक साधणे
‘अंजलीताईची तिच्या समवेत सेवा करणार्या साधकांशी जवळीक आहे. ताई सर्वांना हक्काची वाटते. साधक तिला त्यांची अडचण सांगून तिचे मार्गदर्शन घेतात. तिने सांगितलेले योग्य असते आणि त्यात स्पष्टता असते.
२. चूक झाल्यावर खंत वाटून प्रायश्चित्त घेणे
मी आणि ताई मिळून एक सेवा करत होतो. तेव्हा २ – ३ वेळा ताई एक वस्तू घेण्यास विसरली. त्या वेळी तिला खंत वाटून तिने प्रायश्चित्त घेतले.
३. परिपूर्ण सेवा करणे
अ. रात्री कितीही उशीर झाला, तरी ती सेवा पूर्ण करूनच झोपायला जाते.
आ. ऑक्टोबर २०२० नंतर मी ताईच्या समवेत अधिक सेवा केली. मी एखादी सेवा पूर्ण केली नसेल, तर ताई ती सेवा पूर्ण करते आणि नंतर मला ती चूक सांगून प्रयत्न करण्यास सांगते. एकदा आम्ही कुंकू पिशव्यांत भरून ठेवण्याची सेवा करत होतो. त्या वेळी तिने माझ्याकडून ती सेवा परिपूर्ण करून घेतली. ‘माझ्याकडून कुंकू सांडले नाही ना ?’, हे तिने पाहिले. ही सेवा करतांना मला चांगले वाटत होते.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी काढलेले कौतुकोद्गार !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अंजलीताईचे पुष्कळ कौतुक करतात. त्या नेहमी म्हणतात, ‘‘आमच्या अंजलीमुळे आमची सर्व सेवा लवकर होते. अंजली हक्काची आहे ना !’’
५. भाव
ताई प्रतिदिन ध्यानमंदिरात जाते आणि मानसरित्या देवाशी बोलते अन् दिवसभर त्या दृष्टीने प्रयत्न करते. तिच्यात पुष्कळ भाव आहे. तिच्यातील भाव सेवेतून व्यक्त होतो.’
– चरणसेविका,
कु. अमृता मुद्गल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२१)