साधना करून आत्मबळ वाढवूया ! – कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

महिलादिनाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ व्याख्यान

कोल्हापूर – स्त्री हे देवीचे रूप आहे. तिने मनात आणले, तर ती काहीही करू शकते. विज्ञान, प्रशासन, अंतराळ यांमध्ये स्वतःचे कर्तृत्व तिने सिद्ध केले आहे. घरातील महिला संस्कारक्षम असेल, तर ती समाजाला पालटू शकते. झाशीची राणी लक्ष्मीबाई लहान बाळाला पाठीवर घेऊन इंग्रजांशी लढल्या. शहाजीराजे कर्नाटकात होते तेव्हा जिजाबाईंनी राज्यकारभार सांभाळला. साधनेच्या बळावर हे सर्व या स्त्रियांनी साध्य केले. त्याचप्रकारे आपणही साधना करून आत्मबळ वाढवल्यास समाजात नित्य घडणार्‍या प्रसंगांना तोंड देऊ शकतो, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केले. त्या ८ मार्च या दिवशी महिलादिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात बोलत होत्या. सूत्रसंचालन कु. प्रेरणा मठपती यांनी केले.

या वेळी काहींनी व्यक्त केलेले मनोगत

आसावरी एरंडे – छान मार्गदर्शन केले. मीही स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला जोडलेले आहे. त्याच्यातून शिकायला मिळाले.

कल्पना बोंगाळे – विषय ऐकतांना पुष्कळ छान वाटले.

सविता लव्हटे – युवती-महिला यांनी आपली संस्कृती जपलीच पाहिजे.