प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. ९ मार्च या दिवशी ‘साधनेविषयी शंकांचे निरसन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ३)
भाग २ वाचण्यासाठी या लिंकवर किल्क करा : https://sanatanprabhat.org/marathi/457578.html
२. साधनेविषयी शंकांचे निरसन
२ ई. एकदा साधनेत आनंद मिळायला आरंभ झाला, तर व्यावहारिक समस्यांमुळे तो खंडित होण्याचा विचार करू नये !
श्रीमती गणोरकर : आपल्या कृपेने साधनेत पुष्कळ आनंद मिळत आहे. कधी कधी व्यावहारिक अडचणी येतात. तेव्हा मनाचा संघर्ष होतो.
परात्पर गुरु डॉक्टर : साधनेचा आलेख दोन-चार पावले पुढे, एक-दोन पावले मागे असाच असतो. आध्यात्मिक पातळी ५० टक्के झाल्यानंतर मागे जाणे उणावत जाते. आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर साधनेत मागे जाणे पुष्कळच उणावत जाते. तोपर्यंत सर्वांच्या साधनेत असेच होते.
‘६० टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानंतर आलेख सरळ रेषेत होतो. तेव्हा ‘दुःख न जाणवता आनंद, आनंद आणि आणखी आनंद’, अशी मनाची स्थिती होते. तोपर्यंत प्रयत्न चालू ठेवायचे. तुम्ही ‘आनंद मिळतो’, या टप्प्यापर्यंत आलात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुष्कळ साधकांना या टप्प्याला यायलाच ५ ते १० वर्षे लागतात. एकदा आईस्क्रिम खाल्ले, आनंद मिळाला, तर वाटते ना, आणखी खावे, आणखी खावे. त्याच प्रकारे हे आहे. नामजप, सेवा इत्यादी करतांना आनंद मिळतो, तर मनाला ‘तेच पाहिजे’, असे वाटते ना ? त्यामुळे सेवा होईल आणि साधनाही होईल. आता मुळीच विचार करू नका. ‘आनंद मिळतो आहे ना ?’, याकडेच लक्ष द्या.
२ उ. व्यवहारातून बाहेर निघून जलद प्रगती होण्याच्या उद्देशाने आश्रमात काही काळ राहून साधना शिका !
कु. रूची पवार : मार्गावर झालेल्या गंभीर दुर्घटनेनंतर मी बरी झाले. तेव्हापासून ‘मला पुनर्जन्मच मिळाला आहे’, असे वाटते. ‘आता हा दुसरा जन्म आपल्याच चरणी …
परात्पर गुरु डॉक्टर : आता तिसरा जन्म नको वाटतो ना ? या जन्मात साधना करून कायमचे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होऊन जा !
कु. रूची पवार : व्यवहारातून बाहेर पडायचे आहे. आपण मला आपल्या चरणांपाशी घ्यावे.
परात्पर गुरु डॉक्टर : थोडा काळ, म्हणजे १ – २ मास सनातनच्या आश्रमात रहायला येणार का ?
कु. रूची पवार : हो.
परात्पर गुरु डॉक्टर : सर्व लवकर लवकर शिकून घेतले, तर बाहेर प्रसारात जाऊन शिकवू शकशील ना ?
कु. रूची पवार : हो.
परात्पर गुरु डॉक्टर : घरी राहून साधना शिकायला २ – ३ वर्षे लागतात. आश्रमात १ – २ मासात शिकून होते. घरात सर्व मायेच्या गोष्टी असतात. दूरदर्शन (टी.व्ही.) असतो. आश्रमात काहीच नाही ना ? २४ घंटे साधनेचेच विचार असतात. आपण शिकून लवकर लवकर इतरांना शिकवायचे आहे. जे चांगले लोक आहेत, त्यांना महायुद्धापूर्वी साधना समजली पाहिजे !
(क्रमश:)
भाग ४. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/458455.html