वारकर्‍यांच्या मागण्या अधिवेशनात मांडल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार !- ह.भ.प. गणेश महाराज शेटे, अध्यक्ष, विश्‍व वारकरी सेना

अकोला, ५ मार्च (वार्ता.) – संत नामदेव महाराज यांची यावर्षी ७५० वी जयंती असतांना त्यांचे शासकीय अभिवादन यादीतून वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यात यावे आणि कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, असे सांगून राज्य सरकारने धार्मिक कार्यक्रमांवर आणलेली बंदी हटवावी, या वारकर्‍यांच्या २ प्रमुख मागण्या राज्यअधिवेशनामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी मांडल्या.

ह.भ.प. गणेश महाराज शेटे

याविषयी विश्‍व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. वरील दोन्ही मागण्यांची राज्य सरकारने त्वरित नोंद घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन भव्य स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत, असेे ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे.