ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणार्‍याला अटक

आगरा (उत्तरप्रदेश) – ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याच्या प्रकरणी पोलिसांनी फिरोजाबादमधील एका तरुणाला अटक केली.

त्याला सैन्यात भरती व्हायचे होते; मात्र ती रहित झाल्याने त्याने त्याचा राग काढण्यासाठी दूरभाष करून बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती दिली. (अशा समाजविघातक विकृती असणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – संपादक)

यामुळे पर्यटकांना ताजमहालमधून बाहेर काढत दरवाजे बंद करण्यात आले होते.