पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून संमत

मुंबई – पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमत केला आहे. संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर वनमंत्रीपदासाठी लॉबिंग चालू झाली आहे. आपले मंत्रीपद टिकावे यासाठी संजय राठोड अखेरपर्यंत प्रयत्न करत होते. या प्रकरणावरून शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यावर पुष्कळ प्रमाणात टीका करण्यात आली होती.

बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण हीचा पुणे येथील रहात्या घरातून पडून ७ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची तक्रार करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती.