१. केम्निस (९ आणि १० सप्टेंबर २०२०)
१ अ. ‘साधकांचा सत्संग मिळावा’; म्हणून ५०० कि.मी. अंतर प्रवास करून येणे : कार्ल्सरूहे येथील केर्स्टिन माटेन या साधिका सत्संगाला उपस्थित असतात आणि त्या ‘युनकेन’ येथे झालेल्या ३ दिवसांच्या कार्यशाळेलाही आल्या होत्या. ‘केवळ साधकांचा सहवास मिळावा’, यासाठी त्या कार्ल्सरूहे या ठिकाणापासून ५०० कि.मी. अंतराचा प्रवास करून आल्या होत्या.
२. लेपझिग (११ ते १७ सप्टेंबर २०२०)
२ अ. सद्गुरु सिरियाक आणि अन्य साधक यांच्यासारखे प्रसन्न व्यक्तीमत्त्व यापूर्वी कधीच अनुभवले नसल्याचे सांगणे : १२.९.२०२० या दिवशी श्री. आंद्रे लुइनबर्ग या साधकाच्या घरी ‘नामजपादी उपाय’ याविषयी प्रवचन आयोजित केले होते. प्रवचनाला १६ जिज्ञासू, साधकांचे काही नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. लेपझिग या ठिकाणी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांना पाहून काही जिज्ञासू आणि काही लॉग-इन सदस्य यांना आनंद झाला. उपस्थितांपैकी एका जिज्ञासूने सद्गुरु सिरियाक आणि अन्य साधक यांच्यासारखे प्रसन्न व्यक्तीमत्त्व यापूर्वी कधीच अनुभवले नसल्याचे सांगितले.
२ आ. अध्यात्माविषयी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन मिळणे : पूर्वी सत्संगात उपस्थित राहिलेल्या कॅरोलिन माति या साधिका त्यांच्या पतीच्या समवेत आल्या होत्या. साधकांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले, ‘‘आता मला अध्यात्माविषयी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन मिळाला आहे.’’ कॅरोलिन यांचे साधनेतील प्रयत्न वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. त्या जर्मन भाषेतील सत्संगात पुन्हा येऊ लागल्या आहेत. त्यांनी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने घेण्यात येत असलेल्या शिबिरात उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
३. बर्लिन (१८ ते २१ सप्टेंबर २०२०)
३ अ. शांती, आनंद आणि भाव अनुभवता येणे : बर्लिन येथील मेळाव्यात उपस्थित असलेल्या एक महिला आमच्या वाहनापाशी आल्या आणि त्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्या वेळी त्यांना ‘आतून शांत, आंतरिक आनंद आणि भाव यांची अनुभूती येत होती’, असे त्या म्हणाल्या. आमच्या समवेत बोलत असतांना आम्हाला त्यांच्या तोंडवळ्यात पालट जाणवले. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला त्या उपस्थित होत्या. त्या वेळीही त्यांच्यात इतका पालट जाणवला की, ‘त्या कुणीतरी अन्य व्यक्ती आहेत’, असे वाटत होते.
३ आ. रामनाथी आश्रमात असल्याची अनुभूती येणे : शिल्पा माधुरी प्रतिदिन साधकांना भेटण्यासाठी येत आणि त्या कुटुंबियांप्रमाणे साधकांसाठी स्वयंपाक करत असत. शिबिरात उपस्थित असतांना त्यांचा भाव जागृत होत होता. त्यांना ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे वाटत होते.
४. दीन्सलाकन (२७.९.२०२०)
४ अ. जिज्ञासूला स्लीप पॅरालिसिस’च्या माध्यमातून होत असलेले वाईट शक्तींचे त्रास ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणेच तंतोतंत जुळणे : नील्स वाईसबो नावाचे एक जिज्ञासू ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावरील लेख गेल्या एका वर्षापासून वाचत आहेत. आम्ही ‘अध्यात्मप्रसारासाठी भ्रमण करत आहोत’, हे कळल्यावर त्यांनी आमची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनी सत्संग, शंकानिरसन, जेवणाची व्यवस्था इत्यादी वेळांचे दिवसभराचे विस्तृत नियोजन केले. ‘झोपेत जखडल्यासारखे होऊन हालचाल करता न येणे (स्लीप पॅरालिसिस)’ किंवा वाईट शक्ती दिसणे अशा प्रकारचे त्यांना होत असलेले आध्यात्मिक त्रास ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणेच तंतोतंत जुळत असल्याचे त्यांनी सांगितले. नील्स वाईसबो यांनी रामनाथी आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली.
५. श्वाईनफर्ट (३०.९.२०२०)
५ अ. नामजपादी उपाय केल्यावर पुष्कळ पालट होणे आणि स्वयंसूचना घेतल्यामुळे ‘राग येणे’ हा स्वभावदोष न्यून झाल्याचे जाणवणे : सेबास्टियन फिशर आणि क्रिस्टिना फिशर यांनी १ मासापूर्वी सत्संगात येणे चालू केले. नामजपादी उपाय केल्यावर त्यांना स्वतःमध्ये पुष्कळ पालट झाल्याचे जाणवले. त्या दोघांनी चुका लिहिणे आणि स्वयंसूचना घेणे आरंभ केले असून स्वयंसूचना घेतल्यामुळे सेबास्टियन यांना त्यांच्यातील ‘राग येणे’ हा स्वभावदोष न्यून झाल्याचे जाणवत आहे. त्या दोघांना आध्यात्मिक प्रगती करण्याची इच्छा आहे. सर्व साधकांना त्यांच्याविषयी जवळीक वाटत होती.’
संकलक : सद्गुरु सिरियाक वाले, युरोप (ऑक्टोबर २०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |