४.१२.२०२३ या दिवशी पुणे येथील श्रीमती दगुबाई नारायण चव्हाण यांचे निधन झाले. २२.११.२०२४ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील साधनेविषयीच्या प्रवचनांची ध्वनीफीत ऐकल्यावर नामजप चालू करणे
‘माझ्या आईचे पूर्वीचे जीवन पुष्कळ हलाखीचे होते. माहेरी कुणीही साधना करत नसल्यामुळे सर्वांना पूर्वजांचे त्रास होते. आई माझ्याकडे पुण्याला आल्यावर तिला साधना कळली. वर्ष २००२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आवाजातील साधनेविषयीच्या प्रवचनांची ध्वनीफीत ऐकल्यावर आई नामजप करू लागली. ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू केल्यावर तिचा त्रास उणावला.
२. वर्ष २००३ मधील गुरुपौर्णिमेनंतर आई माझ्याकडेच राहिली. आईचे वय ९३ वर्षे असतांनाही ती स्वतःचे सर्व स्वतः आवरायची.
३. आईला भजने म्हणायची आवड होती. ती वरचेवर भजने म्हणायची.
४. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अनुसंधानात असणे
आईला त्रास व्हायला लागल्यावर ती गुरुदेवांशी सूक्ष्मातून बोलायची. ती म्हणायची, ‘परम पूज्य, माझा त्रास न्यून करा.’ ती दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक जवळ ठेवायची. श्रीकृष्णाचे पदक गळ्यात घालायची. ती सतत गुरुदेवांना आळवायची. ‘गुरुदेवांना सांगितले की, मला बरे वाटते’, असे ती म्हणायची. मीही गुरुदेवांना प्रार्थना करत असे, ‘हे गुरुदेवा, माझ्याकडून आईची सेवा करून घ्या. आईचा नामजप सतत चालू ठेवा.’
५. शेवटच्या आजारपणात सतत नामजप करणे
वर्ष २०२३ मध्ये तुळशीच्या लग्नानंतर आईचा त्रास वाढला. तिला जुलाब होऊ लागले. ती ४ – ५ दिवस फळांचा रस आणि नारळाचे पाणी घेत होती. त्या वेळी तिचा हातात माळ घेऊन सतत नामजप चालू होता.
६. निधन
गुरुदेवांना माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘आपणच आईची काळजी घेत आहात. आईला शांतपणे सोडवा.’ त्या वेळी मी भ्रमणभाषमध्ये ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप लावून भ्रमणभाष आईजवळ ठेवला. ४.१२.२०२३ या दिवशी दुपारी २.३० वाजता आईने डाळिंबाचे सरबत घेतले आणि बसल्याजागी शांतपणे डोळे मिटले. त्या वेळी तिच्याकडे बघून मला शांत वाटले. त्या वेळी ‘गुरुदेवांनी आईची काळजी घेतली’, असे मला जाणवले.
‘आईला पुढची गती मिळो’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. मीनाक्षी नारायण पाटील ((कै. (श्रीमती) दगुबाई चव्हाण यांची मुलगी, वय ६८ वर्षे), कोथरूड, पुणे. (६.२.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |