स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संग ऐकतांना साधिकेने केलेले चिंतन आणि त्या वेळी तिला सुचलेली कविता

सौ. राजलक्ष्मी जेरे

१. ‘सत्संगामध्ये ‘विचारून न करणे’, याविषयी सूत्रे ऐकतांना झालेली विचारप्रक्रिया

अ. ‘विचारून न करणे’ या अहंच्या पैलूमुळे आपल्या साधनेची पुष्कळ हानी होते. ‘स्वार्थीपणा आणि कर्तेपणा’ हे या अहंच्या पैलूमागे असणारे मूळ स्वभावदोष आहेत.

आ. स्वार्थीपणा आणि कर्तेपणा हे दोन पुष्कळ मोठे अडथळे आहेत; कारण या दोन्ही स्वभावदोषांमुळे आपले लक्ष स्वतःवरच केंद्रित रहाते.

इ. स्वार्थीपणामुळे आपण केवळ आपलाच विचार करतो, म्हणजे तिथे ‘मीपणा’ आहे.

ई. कर्तेपणामुळे आपण देवापासून पुष्कळ दूर जातो. ‘सर्व मी केले’, असे आपल्याला वाटते. त्यामुळे अहं वाढतो आणि जिथे ‘मी’ आहे तिथे ‘देव’ नाही.

२. ही विचारप्रक्रिया चालू असतांना देवाने सुचवलेले काव्य

जिथे मी नाही, तिथे देव आहे ।
जिथे मी आहे, तिथे देव नाही ।
जिथे देव आहे, तिथे ‘मी’साठी जागाच उरत नाही ॥ १ ॥

जिथे मी आहे, तिथे कर्तेपणा आहे ।
जिथे कर्तेपणा आहे, तिथे अहं आहे ॥ २ ॥

जिथे मी आहे, तिथे स्वार्थ आहे ।
जिथे स्वार्थ आहे, तिथे अंधार आहे ॥ ३ ॥

जिथे इतरांचा विचार आहे, तिथे मी नाही ।
जिथे मी नाही, तिथे देव आहे ॥ ४ ॥

जिथे भाव आहे, तिथे देवाचे अस्तित्व आहे ।
जिथे देवाचे अस्तित्व आहे, तिथे मी नाही ॥ ५ ॥

जिथे मी आहे, तिथे देव नाही ।
जिथे देव आहे, तिथे ‘मी’साठी जागाच उरत नाही ॥ ६ ॥

‘ही सूत्रे देवाने माझ्या लक्षात आणून दिली’, त्यासाठी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (५.३.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक