परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि आलेल्या अनुभूती !

५.७.२०२० या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनाची ध्वनीचित्रफित पाहून पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांविषयी केलेले मार्गदर्शन ऐकून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ध्वनीचित्रचकती बघतांना ‘पती-पत्नी यांनी एकमेकांशी वागतांना आणि बोलतांना ‘साधक अन् साधिका’ असा भाव का ठेवायला हवा ?, तसेच आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केलेच पाहिजे’, हे कळणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ध्वनीचित्रचकती (व्हिडिओ) बघतांना ‘आपण आश्रमातच रहात आहोत’, हा भाव ठेवला पाहिजे’, असा विचार आला. ‘पती-पत्नी यांनी एकमेकांशी वागतांना आणि बोलतांना ‘साधक अन् साधिका’ असा भाव का ठेवायला हवा ?, तसेच आध्यात्मिक प्रगती करायची असेल, तर स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केलेच पाहिजेे’, हे कळले. त्यांनी ‘साधनेत प्रगती कशी करायची ?’ याविषयीची सूत्रे फारच छान समजावून सांगितली. ‘त्यांची चैतन्यवाणी थांबूच नये’, असे मला वाटत होते.’ – सौ. स्नेहल पांडे, चिंचवड, पुणे.

१ आ. ‘नामजपाएवढेच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व असून स्वभावदोष जाण्यासाठी स्वयंसूचना सत्रे करावी, ज्येष्ठ साधकांचे मार्गदर्शन घेऊन साधना केली पाहिजे’, असे परात्पर गुरु डॉक्टर सांगत असतांना भावजागृती होऊन ‘ऐकतच रहावे’, असे वाटणे : मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अमृतवाणी प्रथमच ऐकली आणि ‘त्यांचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटू लागले. मला माझ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. ‘घरात कसे वागावे ? सेवा करतांना समष्टी साधना कशी होते ?’, याविषयी मला समजले. ‘तर्कबुद्धी ही साधनेत अडथळा आहे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला नामजपाइतकेच प्राधान्य दिले पाहिजे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार न करता वर्तमानात रहावे अन् आपल्या अमूल्य वेळेचा उपयोग नामजपासाठी करावा. घराचा आश्रम बनवावा. स्वभावदोष न्यून करण्यासाठी स्वयंसूचना द्याव्यात, स्वभावदोष वहीत लिहून काढावेत, ज्येष्ठ साधकांचे मार्गदर्शन घ्यावे. अध्यात्म हे अनंताचे शास्त्र असून त्यात कृतीला अधिक महत्त्व आहे. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांच्या पुढे गेल्यावर आपली साधना सहज होत जाईल’, असेे गुरुदेव सांगत होते आणि मी लक्षपूर्वक ऐकत होतो. तेव्हा माझा भाव जागृत झाला.’ – श्री. अमर वाबळे, गावठाण, पुणे. (दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक)

१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन याविषयी केलेले मार्गदर्शन ऐकून जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत !

१. ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाचा सोहळा पहातांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाच पहात आहोत’, असे जाणवले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन चालू असतांना ‘त्यांंच्या वाणीत ‘सहजता आणि चैतन्य आहे’, असे मला जाणवले.

३. स्वभावदोष-अहं यांचे निर्मूलन करणे अत्यावश्यक आहे’, याची मला जाणीव झाली.’

– सौ. संपदा लावंड, हडपसर, पुणे.

१ ई. मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन होणे

१ ई १. ‘परात्पर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला पुष्कळच लाभ झाला. माझ्या मनात साधनेविषयी असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले.’ – श्री. भागवत येप्रे आणि श्री. सचिन भापकर (श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ), पुणे

१ ई २. ‘गुरुदेवांनी सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे देऊन साधना कशी करायची ?’, हे सांगितले. त्यातून मला पुष्कळ शिकायला मिळाले.’- सौ. पौर्णिमा खोपडे, भोर, पुणे. (हितचिंतक)

१ ई ३. ‘गुरुदेवांनी मार्गदर्शन केल्यावर माझ्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे मिळाली. ‘भाव कसा असावा ? भावपूर्ण नामजप करण्याचे महत्त्व काय ?’ याविषयी कळले.’ – सौ. राणी बडाख, वाघोली, पुणे. (हितचिंतक)

१ ई ४. ‘परात्पर गुरुदेवांनी साधकांच्या प्रश्‍नांना जी उत्तरे दिली, त्यांतून माझ्या सर्व शकांचे निरसन झाले.’- सौ. स्मिता पोतदार, सिंहगड रस्ता, पुणे. (हितचिंतक)

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

२ अ. ‘साधना किती महत्त्वाची आहे !’, हे लक्षात येणे आणि गुरुदेवांची अमृतवाणी ऐकून आनंद होणे : श्री गुरूंची अमृतवाणी मी प्रथमच ऐकत होते. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य मन एकाग्र करून ही अमृतवाणी ऐकत होते. घरातील कुटुंबियांच्या तोंडवळ्यावरचा आनंद आणि चैतन्यमय वातावरण बघून मी पुष्कळ आनंदी झाले. गुरुदेवांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधना आणि अध्यात्म यांविषयी असलेल्या बर्‍याच प्रश्‍नांची उत्तरे मिळाली आणि पुष्कळ शिकायलाही मिळाले.

‘ईश्‍वराची भक्ती केली, तरच ईश्‍वर संकटकाळात धावून येईल’, असेही गुरुदेवांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. त्यातून ‘साधना किती महत्त्वाची आहे !’, हे माझ्या लक्षात आले. गुरुदेवांची अमृतवाणी ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.’

– सौ. अनिता तळेकर, शिरवळ, पुणे (जिज्ञासू)

२ आ. ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदेवांचे दर्शन व्हावे’, अशी इच्छा असणे आणि कार्यक्रमात गुरुदेवांना पाहिल्यापासून मनातील विचार न्यून होऊन मनाला प्रसन्नता जाणवणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच मला ‘एकदा तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन व्हावे’, असे वाटत होते. गुरुपौर्णिमेचा सोहळा पहातांना मला गुरुदेवांचे दर्शन झाले आणि माझा भाव जागृत झाला. ‘माझ्यासाठी गुरुदेवांनी दर्शन दिले. माझ्यासाठी गुरुदेव किती करतात !’, असे मनात येऊन मला कृतज्ञता वाटली.

‘मी साधना करायला पाहिजे’, असा विचार येऊन मी स्वतःमध्ये परिवर्तन करायचे ठरवले. मी कार्यक्रम पाहिल्यापासून मला सतत गुरुदेवांचे स्मरण होऊन मनातील अन्य विचार न्यून झाले आहेत. मला प्रसन्नता जाणवत आहे. गुरुदेवांच्या सत्संगामुळेच हे सगळे चांगले विचार माझ्या मनात आले. त्याविषयी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ – सौ. अपर्णा गटकुळ (हितचिंतक), इंदापूर, पुणे.

२ इ. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी घरातील अडचणी कशा सोडवायच्या ?’ ते सहजतेनेे सांगितले. फार छान वाटले.’ – श्री. राजेश नाईक, हडपसर, पुणे. (‘सनातन प्रभात’चे वाचक)

२ ई. ‘परात्पर गुरूंनी सांगितलेले नामाचे महत्त्व आणि ‘नुसते ग्रंथ वाचण्यापेक्षा ते कृतीत आणणे’, हे किती महत्त्वाचे आहे ?’, हे सूत्र पटले.’ – सौ. नीला वाणी, सिंहगड रस्ता, पुणे. (जिज्ञासू)

२ उ. ‘साधकांचे प्रश्‍न आणि गुरुदेवांनी दिलेली उत्तरे यांतून ‘प्रतिदिनच्या जीवनात अध्यात्म कसे जगायचे ?’, हे छान समजले. पुष्कळ आनंद मिळाला.’- सौ. लीना कार्लेकर, सिंहगड रस्ता, पुणे. (जिज्ञासू)

२ ऊ. ‘परात्पर गुरुदेवांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन कर्मसिद्धांत सांगितला. ‘आपण जे शिकतो, ते आचरणात आणणे आवश्यक आहे’, असे यातून शिकायला मिळाले. ही सर्व उदाहरणे फार काही शिकवून जाणारी होती.’ – सौ. मनीषा भालेराव, मंचर, पुणे. (धर्मप्रेमी)

२ ए .‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन पुष्कळ छान होतेे. ‘अगदी आपल्या जवळ बसून प्रेमाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात सत्संग घडत आहे’, असे वाटल्यामुळे वेळ कसा गेला ?’, ते मला कळलेच नाही.’ – सौ. रश्मी बापट, सातारा रस्ता, पुणे. (‘सनातन प्रभात’च्या वाचक)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक