चित्रपट, नाटके, ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच विविध माध्यमे यांद्वारे हिंदूंच्या देवता, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांना आळा घाला ! – हमारा देश संघटना

बेळगाव, २७ जानेवारी (वार्ता.) – देशातील चित्रपट, नाटके, तसेच अ‍ॅमेझॉन, नेटफ्लिक्ससारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. तरी या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, या मागणीसाठी हमारा देश संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून उपतहसीलदार श्रीशैल पारगी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनासमवेत, हिंदु जनजागृती समिती, कपिलेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनेही प्रशासनाला याच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतांना हमारा देश संघटनेचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ
उप-तहसीलदार श्रीशैल पारगी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हमारा देश संघटनेचे कार्यकर्ते आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ

या वेळी हमारा देश संघटनेचे सर्वश्री व्यंंकटेश शिंदे, विजयकुमार टी, सचिन इनामदार, सौ. प्राजक्ता बेडेकर, सौ. हिमांगी प्रभु, सौ. पूजा पाटील, सौ. प्राजक्ता शहापूरकर, श्रीमती पूजा गावडे, सौ. सविता नायक, श्री. अजित पाटील, श्री. देवदत्त मांजरेकर, श्री. लक्ष्मीकांत कोटगी, श्री. नरेंद्र आणवेकर, श्री. संजय बेळगावकर, श्री. मुकेश वेरणेकर, कॅप्टन कृष्णा शहापूरकर, सर्वश्री निखिल कडदावर, महेश पाटील, भालचंद्र यादव, सचिन इनामदार, कपिलेश्‍वर ट्रस्टचे श्री. राजू गोडसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि श्री. हृषिकेश गुर्जर, तसेच धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर उपस्थित होते.

विशेष

कपिलेश्‍वर मंदिर ट्रस्ट येथे २५ जानेवारी या दिवशी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आर्श विद्याकेंद्राचे पू. चित्प्रकाशानंद स्वामीजी

याविषयी जागृती करण्यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी कपिलेश्‍वर देवस्थान येथे प्रबोधन आणि स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी बेळगाव येथील आर्श विद्याकेंद्राचे पू. चित्प्रकाशानंद स्वामीजी आणि माजी प्राचार्य श्रीकृष्ण प्रभू अजगांवकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी माजी नगरसेवक आणि कपिलेश्‍वर देवस्थान समिचीचे संचालक श्री. सुनील बाळेकुंद्री, श्री. राजू भातकांडे आणि कॅप्टन कृष्णा शहापूरकर उपस्थित होते. या वेळी ६०० जणांच्या स्वाक्षर्‍या प्राप्त झाल्या. या अभियानास समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.