युवा पिढीने भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक ! – प्रा. नम्रता कंटक

सातारा, २४ जानेवारी (वार्ता.) – आधुनिक युगात महान व्यक्तींची जयंती साजरी केली जाते; परंतु भगवद्गीता ग्रंथाचीही जयंती साजरी केली जाते, हे त्याहून विशेष आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली, विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांनाही गीतेची भुरळ पडली होती. त्यांनी स्वतःच्या आयुष्यात गीतेला विशेष महत्त्व दिले. वर्तमानकाळात युवक आणि युवती यांनी भगवद्गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे, असे आवाहन प्रा. नम्रता कंटक यांनी केले. गीता जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.