आम्ही ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेल्या व्यक्तींना संपर्क करत होतो. आम्ही एका वयस्कर व्यक्तीला भ्रमणभाष केला. तेव्हा ते म्हणाले, मला तुमचे सनातन पंचांग मागील दोन वर्षे मिळाले नाही. मला मागील दोन वर्षांची आणि वर्ष २०२१ चे सनातन पंचांग हवे आहे. मी तुमची पंचांगे साठवून ठेवतो. मला त्यातील माहिती पुष्कळ आवडते.
ती व्यक्ती लगेच पैसे द्यायलाही सिद्ध होती. मी लगेच त्यांच्यासाठी दुकानात सनातन पंचांग ठेवले आणि तसे त्यांना कळवले. ते त्वरित पंचांग घेऊन गेले आणि त्यांनी पंचांग मिळाल्याचे भ्रमणभाष करून लगेच कळवले.
तेव्हा लक्षात आले, समाजातील लोकांना सनातन पंचांगाचे मूल्य किती आहे !
– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (१.१.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |