शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान

मुंबई – भारतीय शास्त्रीय संगीतातील रामपूर सहसवान घराण्याशी संबंध असलेले आणि पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे १७ जानेवारी या दिवशी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. लता मंगेशकर यांसह अनेक गायकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले होते.