सातारा नगरपालिकेच्या सभापती निवडी जाहीर

सर्व विषय समित्यांवर महिलांना प्राधान्य

सातारा नगरपालिकेत प्रथमच सर्व महिला सभापती

सातारा, १३ जानेवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या सभापती निवडी नुकत्याच पार पडल्या. यामध्ये महिला सबलीकरणाचे धोरण अवलंबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पालिकेतील सर्वच विषय समित्यांवर महिलांना प्राधान्य दिले आहे. नव्याने निवडी झालेल्या सभापतींवर समाजातून अभिनंदन करण्यात येत आहे.

सातारा नगरपालिकेत प्रथमच सर्व सभापती महिला आहेत. बांधकाम सभापतीपदी भाजपच्या आक्रमक नगरसेविका सिद्धी पवार यांची निवड झाली आहे. आरोग्य सभापतीपदी अनिता घोरपडे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सीता हादगे यांना पाणीपुरवठा, स्नेहा नलावडे यांना नियोजन, तर रजनी जेधे यांना महिला बालकल्याणचे उत्तरदायित्व सोपवण्यात आले आहे.