आज गोवा विधानसभेत विधीमंडळ दिन : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित रहाणार

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

पणजी – गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षानिमित्त गोवा विधानसभा संकुलात ९ जानेवारीला दुपारी ४ वाजल्यापासून विधीमंडळ दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. त्याचसमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माविन गुदिन्हो आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची उपस्थिती असेल.

या वेळी एक लघुपट दाखवण्यात येईल, तसेच सर्व मान्यवरांची भाषणे होतील. त्याचप्रमाणे तिसर्‍या गोवा, दमण आणि दीव विधानसभेतील सदस्यांचा सत्कार करण्यात येईल. शेवटी उपराष्ट्रपती नायडू संबोधित करतील.