भाजी मंडईत क्षुल्लक कारणावरून झालेल्या आक्रमणात एक जण मृत

समर्थ मंदिर परिसरात झालेल्या खुनातील संशयितांना अटक, तर भाजी मंडईत क्षुल्लक कारणावरून झालेल्या आक्रमणात एक जण मृत

सातारा जिल्ह्यातील खुनांच्या घटना म्हणजे वाढते अराजकच !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १८ डिसेंबर (वार्ता.) – येथील समर्थ मंदिर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून १५ डिसेंबरच्या रात्री ४ जणांनी धारदार शस्त्रांनी एकाचा खून केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी २ घंट्यांमध्ये संशयितांना अटक केली. कराड येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून डोक्यात फरशी घालून एकाचा खून करण्यात आला. भाजी मंडईतील एका ज्वेलर्सच्या दुकानासमोर ही घटना घडली असून मारेकरी पसार झाले आहेत. आक्रमण झालेल्या युवकाला प्रत्यक्षदर्शींनी रुग्णालयात नेले; मात्र आधुनिक वैद्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.