कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा देवाचे दर्शन मर्यादित भाविकांनाच !

कोल्हापूर – प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला श्री जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही गर्दी टाळण्यासाठी २९ आणि ३० नोव्हेंबर या दिवशी मर्यादित भाविकांना गडावर प्रवेश दिला जाणार आहे. डोंगरावर वाहन क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना प्रवास करण्याची अनुमती देण्यात येणार आहे. त्यामुळे दुचाकीवरून एक, तर चारचाकी वाहनातून दोघांनाच प्रवास करता येणार आहे. या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.